Showing posts with label #old age # बुढापा#म्हातारपण. Show all posts
Showing posts with label #old age # बुढापा#म्हातारपण. Show all posts

Wednesday, May 27, 2020

दुसरं बालपण.......


तरूणपणाचे गेले दिवस ,आलं आत्ता दुसरं बालपण 
डोळ्यांवरचा चष्मा, शरीरावरच्या रूबाबदार सुरकुत्या
जपूया  जरा आपण.

सुरकुतलेल्या शरीरावर नक्षीदार तजेला अजूनही तसाच आहे, 
जीर्ण झालय फक्त शरीर हो,
मन अजूनही तरूण आहे.

काम करून थकलं शरीर, माञ असंख्य आठवणींनी खच्चून भरलेलं आहे,
नजर आहे करडी तशीच ,
फिकुटलेल्या ओठांचं हसू किती छान आहे!

पावलं हळूहळू पडतात हल्ली, 
मनात विचार माञ धावतात अक्षरशः सैरावैरा 
नातवंडांसोबत खेळताना कसा पळून जातो शीण
सारा!

थोडं धावलं तरी कसा  जीव कासावीस होतो
कोणाचं जरासं प्रेम बघून मनाचा कोपरा हळवा होतो. 


रंगीबेरंगी गोळ्या पाहून इंद्रधनुष्य डोळ्यांसमोर तरळते, 
पथ्यपाणी करताना माञ बालपण आठवते!.

हातात असते हल्ली आधारासाठी लांबलचक काठी, 
घोडा घोडा ही खेळतो आम्ही नातवंडांसाठी.

ओझं नसतोच कधी कोणावर, 
आमचा वेगळा घरोबा असतो,
अनुभवांचा खजिना आमच्या ओठांवर नेहमी रेंगाळत 
असतो!.

साध्या सैलसर   कपड्यांमध्येही वाटतं किती आरामशीर,
वेळेच्या बाबतीत  असतो आम्ही नेहमी वक्तशीर.

वेगवेगळ्या छंदांत रमते मन हल्ली ,
निवांत डोळे बंद करून फिरतो गल्लोगल्ली! 

डोक्यावरचे पांढरे केस ,सफेद भुवया, 
सगळ्या म्हातारपणाच्या खुणा वाटतात,
अम्हाला माञ यात दुसरया बालपणाचे पुरावे दिसतात!

म्हातारे दिसलो तरी ,आहोत आम्ही माणसं. ........
प्रेमाची भुकेली,मायेच्या स्पर्शला आसुसलेली,
बाहेरून जीर्ण पण मनाने प्रचंड खंबीर असलेली 
भाबडी गोड माणसं. .................

एकटेपणा नाही वाटंत हो ,
निरागसता असते ना सोबत ,
सगळं कसं अनुभवून ,पाहून ,
आत्ता पुन्हा जगण्याला आव्हान द्यायचं असतं आम्हाला.....

पण आपलीच माणसं रंग दाखवतात, 
ते बघून आमचा बेरंग होतो ना,
तुटतो आम्ही आतून कायमचे ,
जेव्हा आपलीच माणसं आपल्याला स्वीकारत
नाहीत.....
तेव्हाच खरं तर जीव गुदमरतोय की काय असं वाटत
असतं..

पण हा तरीही  'शहाण्या वेड्यासारखं 'सार्थ ठरवायचं असतं  हे अनोखं दुसरं बालपण आम्हाला! ................



                                
                -कुणाल विजय ठाकरे. 


























@Akira❤

 dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹 अकिरा.......❤ तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा.... परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या ...