विजांचा कडकडाट व्हावा,काळ्याभोर आभाळाने
अंधार दाटून यावा,थोडा अंगावर गार शहारा यावा,
आणि घनघोर आवाजानंतर पहिला पाऊस बरसावा
आधि मनात मग जमिनीवर .....रिमझिम हळूवार. ..
दूर कुठेतरी कोकिळेचं गाणं ऐकू यावं
चट्कन पाऊस पडल्यावरचा ,भिजलेल्या मातीचा
वास श्वास तृप्त करून जावा ....भुरळ घातल्यासारखा...
मग बरसाव्या सरींवर सरीं मुसळधार,
ओढे ,मस्त भरून यावे...तुडुंब. .
उन्हाळ्यातला दाह गायब व्हावा मिनिटांत,
कुणीतरी प्रेमानं फुंकर मारल्यासारखा...अलगद
हिरव्या गवतालाही बघून सकारात्मकतेची भावना मनात जागावी..
पालवी फुटलेली झाडं बघून,नव्याने जन्म झाल्याची
जाणीव व्हावी.......मनातही अशीच हिरवी बाग फुलावी...
शेतकरयाचा आनंद मातीच्या प्रत्येक कणात दिसावा,
लगबगीने त्याच्या प्रत्येक क्षण खास वाटावा!.
वाफाळत्या आल्याच्या चहाचा दरवळ,घरभर पसरावा
कांदाभज्यांचा कुरकुरीतपणा हवाहवासा वाटावा...
घराबाहेर पावसाची संततधार आणि आत माञ,
घरच्यांसोबत गप्पांची संस्मरणीय मेजवानी..
कधीतरी,आपले दोन्ही हात पसरून डोळे मिटून पावसाचं पाणी ओंजळीत घ्यावं....मनसोक्त भिजवावं, भिजावं
छञी बाजूला फेकून.....
तर कधी छान पैकी ब्लँकेट अंगावर घेऊन.. खिडकीच्या काचेतून पाऊस साठवून घ्यावा डोळ्यांत
रिमझिमणारा,गरजणारा,बरसणारा.....थेंबाथेंबाने.
कधी अल्लड होऊन सोडून द्याव्या होड्या पाण्यात ...शहाणपणाच्या...
फिराव मनसोक्त चिखलात....वेड्यासारखं. ..वेडं होऊन. .
कधी सोडावे मोकळे पाय ओढ्याच्या गार वाहत्या संथ पाण्यात. ........स्वतःत हरवल्यासारखे.....
प्रत्येक वर्षी येणारा हा पाऊस. ...
तितकाच नव्याने, आनंदाने जपता यावा,जगता यावा
आणि दरवेळेस गेल्या वर्षीचा पाऊसही तसाच मनात बरसत ,रिमझिमत रहावा....एखाद्या गोड मिञासारखा......😍😍😍
-कुणाल विजय ठाकरे.

Very nice
ReplyDelete