Showing posts with label माझ्यातला " मी". Show all posts
Showing posts with label माझ्यातला " मी". Show all posts

Thursday, May 28, 2020

माझ्यातला "मी"

रोज भांडत माझं मन स्वतःच्या बेलगाम भावनांशी, माझ्याच विचारांना मी पाहतो कुरघोडी करून हरताना, आणि अवघड वाटतं माझ्यातला "मी" घडवताना....

 ताण-तणाव ,लोभ ,आळस अन स्वनिर्मित समस्यांनी व्यापलेले हे व्यापलेले आयुष्य घाईघाईने जगताना , जणू बहारदार वसंत फुलण्याआधीच कारपताना , अशक्य वाटतं माझ्यातल्या "मी"ला घडवताना......

 हरणासारख्या मनाला ,स्पर्धाळू बुद्धीला अन स्वार्थी ,जळक्या विचारांना रोज पाहतो मी जिंकताना, हताश होतो पाहून माझ्यातल्या "मी"ला हरताना, आणि अवघड वाटत माझ्यातल्या "मी"ला घडवताना...

 त्रासलोय बघून अहंकाराच्या "मी"ला वाढताना , आणि खऱ्या ,सात्त्विक "मी"ला मारताना , आवडत नाही माणसाला स्वतःशी हरताना, त्याला आवडतं दुसऱ्याशी जिंकताना, म्हणूनच अवघड वाटत माझ्यातल्या "मी"ला घडवताना.......

 तरीही आनंद वाटतो आयुष्य जगताना, कारण स्वतःशीच झगडत , मी सकारात्मकतेने तत्पर आहे ,माझ्यातला "मी" घडवताना ...
                        -कुणाल  विजय ठाकरे .

@Akira❤

 dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹 अकिरा.......❤ तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा.... परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या ...