Showing posts with label NSS. Show all posts
Showing posts with label NSS. Show all posts

Wednesday, September 23, 2020

Not me but you...

 


To all my sweet friends😊💚💚




😊Not me but you...   

काही गोष्टी  कायम लक्षात राहतात ..गोड आठवणी 
बनून...
  NSS ची जादूही अशीच आहे ...- 
अकरावी-बारावी पासून ते पुढेही राष्ट्रीय सेवा योजनेचा एक भाग म्हणून खूप काही शिकलो असं वाटतं...
दोन वर्षांनी आत्ता जेव्हा हे सगळं आठवतो ना..तेव्हा खूप आनंद वाटतो...
वेगवेगळ्या डिव्हीजन मधले आम्ही मुलं मुली कधी एकमेकांचे मित्र होउन गेलो कळलं नाही..
नवनवीन अॅक्टीव्हीटीज करताना...कधी मन समृद्ध झालं समजलंच नाही...
एकत्र जेवणाची तयारी करणं..
एकमेकांच्या बाजूने उभं राहणं ......
कधी भांडूनही ..चुकल्यासारख वाटणं...
दिलेला टास्क पूर्ण करणं...
आपल्याच क्षमता  समाजभानानं जगणं...
पथनाट्य करतांनाचा उत्साह...
लोकांना माहीती सांगण..
सरांनी ठरवून दिलेले ग्रुप. ...अंताक्षरी. ...
रोजच काहीतरी खास उपक्रम. ..
कडक शिस्त .....चुकांमधून शिकणं...
 सकाळी सकाळी लवकर लवकर आवरताना होणारी गडबड...
सगळ्यात पहिला दिवस ...तो एकदिवसीय कॅम्प...
त्यानंतर तो सात दिवसांचा पहिलावहिला  कॅम्प. ..अनेक गोष्टी. ..एकोपा शिकवणारा कॅम्प. ....
स्वतःलाच समृद्ध करणारे हे अनेक अनुभव NSS ने दिले ...
एक वेगळं जग ....मित्र....मैत्री. ...जगता आली....समाजभान म्हणू  कि एक जाणीव. ......
पुढाकार घेण्याची नवीन संधी मिळाली. ..
नंतर सिनियर काॅलेज मधला कॅम्प....तिथलं वातावरण. .एकमेकांच्या मदतीला धावणं
आपल्या कला सादर करणं....
एक नवीन जाणीव जोपासणं ...हे सगळंच मी माणूस म्हणून शिकलो .....
प्रत्येक सेकंद आपल्यापेक्षा ईतरांचा विचार करणं. ....एका सामाजिक ध्यासाने झपाटून जगणं....
नंतर आठवतो शेवटचा दिवस ...
त्या दिवशी आपण सर्वजण रडलेलो ....
शेवटच भावूक मनोगत ....कृतज्ञता ...आदर..प्रेम ..आणि एवढ्या दिवसांच्या आठवणी तो जिव्हाळा. ...
अव्यक्त मनाची धडपड...
आजही आठवतं जसंच्या तसं...सगळं. ...
शेवटपर्यंत आठवत राहतील ह्या आठवणी ..ते दिवस...त्या जाणिवा..
आणि हो #not me but you ..😊
हे कसं विसरता येईल...नाही का..?
खुप छान वाटतं...NSS चा एक भाग असल्याचं समाधान वाटतं......
thanks NSS ...thanks all  my sweet ..talented ..buddies. ..😊
feeling fortunate 😊....
thanks for everything ...






                     -@ आपला कुणाल ठाकरे .

 



@Akira❤

 dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹 अकिरा.......❤ तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा.... परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या ...