Sunday, June 28, 2020

पोलीस ..........खाकितले हिरोज. ..😙😘😍😍


पोलीस...खाकी वर्दीतले जादूगार!

सकाळीच वर्दी घालून ,स्वतःला आरशात बघून 
किती खुश होतो ............!

कमिशनर सरांसमोर गेल्यावर अभिमानाने छाती फुलवून 'येस सर ' म्हणून सलाम करतो......

खांद्यावरचे 'स्टार्स ' बघून आपल्या शौर्यकथांत रमतो...
दिवसभरातली गडबड ,तपास,केसेस.....खबरी....
लहान मुलांसोबत खेळताना सारं काही विसरतो....!

जेवता  जेवता जरी कधी आला फोन तरी  लगेच ड्युटीवर  जातो...
नेहमी कर्तव्यदक्ष असतो ....
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'चा मंत्र सतत जपत असतो ......झपाटल्यासारखा..........

घरची कुरबूर असते थोडी .........वेळ देत नाही म्हणून  .........तरीही सतत हसू फुलवत असतो.....

सणवार....होळी. ...दिवाळी. .......
घरापेक्षा चौकीवरच साजरी होते......
ड्युटी करता करता सुट्टी कुठल्याकुठे जाते.....

ह्यांचे खरे सण तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच
असतात... ...........त्या दिवशी संचलनात शक्तीप्रदर्शन 
करताना  ह्यांची मनं देशासाठी जोरजोरात धडधडतात..........

आपल्या सन्मान होताना त्याचा ऊर भरून येतो.....
गुन्हेगारांसाठी तर तो हिटलर असतो.......!
सतत आपल्या लोकांच्या सुरक्षित आयुष्यासाठी
जीव ओवाळून टाकत असतो............

कधी ट्रॅफिक हवालदार, कधी काॅन्स्टेबल ,कधी 
कमिशनर वेगवेगळ्या पदांवर कसा निर्भिड जबाबदारी पार पाडत असतो. ................
अनेक आव्हानांना हातावर घेऊन सहज जगत असतो........
तरीही तो प्रत्येकाचा खरा मित्र असतो.....

रूबाबदार करड्या नजरेत त्याच्या शौर्य झळकत सोन्यासारखं.......
माहिती नाही कुठे सापडेल हे निधड्या छातीच मन ......पोलीसासारखं......

प्रसिद्धीपासून तो दूर अन् कर्तव्याला करत नाही कसूर....
देशासाठी. ...लोकहितासाठी  प्रामाणिकपणे आपलं
आयुष्य समर्पित करतो ...........
खरच कशीही परिस्थिती असो .........आपलं 'पोलिस असणं ' तो किती  सहज तरीही आदर्श होऊन जगतो ....  ...


सर्व  पोलीस बंधूभगिनिंना सलाम 🙏🙏🙏...





             कुणाल  विजय ठाकरे. 
















Thursday, June 4, 2020

पाऊस मनामनांतला. .....😍😍


विजांचा कडकडाट व्हावा,काळ्याभोर आभाळाने 
अंधार दाटून यावा,थोडा अंगावर गार शहारा यावा,
आणि घनघोर आवाजानंतर पहिला पाऊस बरसावा
आधि मनात मग जमिनीवर .....रिमझिम हळूवार. ..

दूर कुठेतरी कोकिळेचं गाणं  ऐकू यावं
चट्कन पाऊस पडल्यावरचा ,भिजलेल्या मातीचा 
वास श्वास तृप्त करून जावा ....भुरळ घातल्यासारखा...

मग बरसाव्या सरींवर सरीं मुसळधार, 
ओढे ,मस्त भरून यावे...तुडुंब. .


उन्हाळ्यातला दाह गायब व्हावा मिनिटांत,
कुणीतरी प्रेमानं फुंकर मारल्यासारखा...अलगद

हिरव्या गवतालाही बघून सकारात्मकतेची भावना मनात जागावी..
पालवी फुटलेली झाडं बघून,नव्याने जन्म झाल्याची 
जाणीव व्हावी.......मनातही अशीच हिरवी बाग फुलावी...


शेतकरयाचा आनंद  मातीच्या प्रत्येक कणात दिसावा,
लगबगीने त्याच्या  प्रत्येक क्षण खास वाटावा!.

वाफाळत्या आल्याच्या चहाचा दरवळ,घरभर पसरावा
कांदाभज्यांचा कुरकुरीतपणा  हवाहवासा वाटावा...

घराबाहेर पावसाची संततधार आणि आत माञ,
घरच्यांसोबत गप्पांची  संस्मरणीय मेजवानी..

कधीतरी,आपले दोन्ही हात पसरून  डोळे मिटून पावसाचं पाणी ओंजळीत घ्यावं....मनसोक्त भिजवावं, भिजावं 
छञी बाजूला फेकून.....


तर कधी छान पैकी ब्लँकेट अंगावर घेऊन.. खिडकीच्या काचेतून पाऊस साठवून घ्यावा डोळ्यांत 
रिमझिमणारा,गरजणारा,बरसणारा.....थेंबाथेंबाने. 

कधी अल्लड होऊन सोडून द्याव्या होड्या पाण्यात ...शहाणपणाच्या...
फिराव मनसोक्त  चिखलात....वेड्यासारखं. ..वेडं होऊन. .
कधी सोडावे मोकळे पाय ओढ्याच्या गार वाहत्या संथ पाण्यात. ........स्वतःत हरवल्यासारखे.....

प्रत्येक वर्षी येणारा हा पाऊस. ...
तितकाच नव्याने, आनंदाने जपता यावा,जगता यावा
आणि दरवेळेस गेल्या वर्षीचा पाऊसही तसाच मनात बरसत ,रिमझिमत रहावा....एखाद्या गोड मिञासारखा......😍😍😍


     

                        -कुणाल विजय ठाकरे. 




 






@Akira❤

 dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹 अकिरा.......❤ तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा.... परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या ...