रोज भांडत माझं मन स्वतःच्या बेलगाम भावनांशी, माझ्याच विचारांना मी पाहतो कुरघोडी करून हरताना, आणि अवघड वाटतं माझ्यातला "मी" घडवताना....
ताण-तणाव ,लोभ ,आळस अन स्वनिर्मित समस्यांनी व्यापलेले हे व्यापलेले आयुष्य घाईघाईने जगताना , जणू बहारदार वसंत फुलण्याआधीच कारपताना , अशक्य वाटतं माझ्यातल्या "मी"ला घडवताना......
हरणासारख्या मनाला ,स्पर्धाळू बुद्धीला अन स्वार्थी ,जळक्या विचारांना रोज पाहतो मी जिंकताना, हताश होतो पाहून माझ्यातल्या "मी"ला हरताना, आणि अवघड वाटत माझ्यातल्या "मी"ला घडवताना...
त्रासलोय बघून अहंकाराच्या "मी"ला वाढताना , आणि खऱ्या ,सात्त्विक "मी"ला मारताना , आवडत नाही माणसाला स्वतःशी हरताना, त्याला आवडतं दुसऱ्याशी जिंकताना, म्हणूनच अवघड वाटत माझ्यातल्या "मी"ला घडवताना.......
तरीही आनंद वाटतो आयुष्य जगताना, कारण स्वतःशीच झगडत , मी सकारात्मकतेने तत्पर आहे ,माझ्यातला "मी" घडवताना ...
नमस्कार .. ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपल्या मनाशी ,आपल्यातल्या माणसाशी संवाद साधणार आहे .... माझे विचार व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न. .... वाचा ..मला नक्की अभिप्राय कळवा... धन्यवाद. .😊
Subscribe to:
Post Comments (Atom)
@Akira❤
dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹 अकिरा.......❤ तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा.... परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या ...
-
विजांचा कडकडाट व्हावा,काळ्याभोर आभाळाने अंधार दाटून यावा,थोडा अंगावर गार शहारा यावा, आणि घनघोर आवाजानंतर पहिला पाऊस बरसावा आधि मनात मग जमिन...
-
उम्मीदें हमारी दिल में हर वक्त उड़ान भरती हैं , इनमें हर वक्त नयी महक हैं, यह कहा किसी से डरती है! ख्वाब यहाँ परिंदे से है...
-
I am the #Auther😍of my story....📝📇 I have to write my own story... in which I will be the auther of my story.. I don't want to create...
No comments:
Post a Comment