Sunday, July 12, 2020

आशेचा किरण. ..............😊



आशेचा किरण........✌👰👍


सगळं काही अंदाधुंद दिसतंय. . . .
स्वप्न रोज नवी पडतायत खरी पूर्ण होतील याची नाही खात्री. ..............
दररोज नवीन भयंकर घटना घडतायत बेसुमार. ...
बदल घडतायत खरे... पण कुठेतरी आहे टांगती तलवार. .....
प्रत्येकजण जातोय सामोरा सध्याच्या परिस्थितीला....
आपापल्या पद्धतीने. .. .झगडत....
काहीजण वेड्यासारखे अर्ध्यावरच जीव सोडतायत...
प्रत्येकालाच कुठेतरी वैताग आलाय सगळ्यांचा......
अनुभवलंय सर्वांनी एवढं कि आत्ता एखादा ग्रंथच लिहून होईल....!
कसं का असेना मन म्हणतं ही ही वेळ जाईल.....
कधीकधी वाटतं......
गोंधळ आहे ....मान्य आहे. ..
पण आपणच तो वाढवतोय ना.....!
आणखी थोडा संयम. ..अस म्हणत आपण हिंमतीन...
समजूतदार होऊन वागतोच आहोत ना.....
बस्स आत्ता आणखी काही वेळ. ..
जोपर्यंत समोरचं सगळं पहिल्यासारखं होत नाही..
तोपर्यंत एकजूटीने लढत राहूया....

आशेचा किरण आहेच कि कुठेतरी. ..
जो दिसत नाही पण नक्कीच आहे ......आपल्याच मनात....
पण ते मन तर नैराश्यात गुंतलय....
म्हणून जरा स्वतःच नव्याने जगूया ह्या काळात. .....
कोणीतरी म्हंटलय ना......
परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी😊........
सर्व काही  सुरळीत होईल लवकरच पहिल्यासारखं. ..
आपणही स्वतःला शोधूया ह्या काळात. .....
नव्याने. ...सकारात्मकतेने.....झपाटून. .....सुरक्षित राहून. ............
मग आहात ना तयार ,एक वेगळी उर्जा घेउन ह्या आव्हानातही जगूया.....
चला जगूया......परिस्थितीला जिद्दीने बदलूया.......







                    -कुणाल विजय ठाकरे. 





No comments:

Post a Comment

@Akira❤

 dedicated To every girl respectfully .......🌹🌹🌹🌹 अकिरा.......❤ तिचा रस्ताच वेगळा आहे...ध्येयवेडा.... परंपराच्या सोहळ्यात कधी बंधनाच्या ...